व्हिएतनाम: चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमधील मृतांची संख्या 1 हजारांवर गेली आहे. कोरोनाव्हायरसची दहशत अजूनही व्यापक आहे, परंतु व्हिएतनामच्या थान हो प्रांतात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची घटना घडली आहेत. ज्यामुळे 23 हजारहून अधिक बदके आणि कोंबडीची हत्या केली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मंगळवारी थान हो प्रांताच्या नोंग कांग आणि क्वांग जुआंग जिल्ह्यात तीन समुदायातील 10 घरांमध्ये ए / एच 5 एन 6 बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला असल्याचे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.
देशाच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मते 2019 मध्ये, 24 प्रांतातील 41 जिल्ह्यांमध्ये व शहरांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून आला आणि 1 लाख 33 हजार पक्षी मारले गेले.