पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पुण्यात ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. तसेच हलगीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला.
दरम्यान आम आदमी पक्षाला दिल्लीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आम आदमी पक्षाला ६३ जगावर आघाडीवर असून भाजप ७ जागा आघाडीवर आहे.