हल्लीच्या काळात सोशल मीडियावरील मित्रांची संख्या वाढली असली तरी जीवाभावाची, जीवाला जीव देणाऱ्या मित्रांचे प्रमाण मोजकेच राहिले आहे. अशा मैत्रीची उदाहरणंही फारशी दिसत नाहीत.
सिनेसृष्टीसारख्या झगमगाटाच्या, प्रचंड स्पर्धेच्या आणि वर्चस्वासाठीची चढाओढ असलेल्या क्षेत्रात तर दीर्घकाळ मैत्री टिकून राहण्याची उदाहरणे फार कमी दिसतात. त्यातही एखादा अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातील गाढ मैत्री बराच काळ टिकून राहिलीय, असं सहसा दिसत नाही.
पण सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांनी मात्र आपल्या मैत्रीतून एक नवा आदर्शच घालून दिला आहे. या दोघांच्या मैत्रीत, नात्यात अनेक चढउतार आल्याची चर्चा झाली; पण सलमान आणि कॅटरिनाची मैत्री आजवर कोणालाही समजू शकलेली नाही. याविषयी अनेकदा अफवाही पसरवल्या गेल्या.
कधी हे दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले गेले, तर कधी या दोघांत ब्रेकअप झाल्याचे बोलले गेले. पण त्यांची मैत्री अबाधित राहिली. अलीकडेच कॅटने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, सलमान हा तिचा बेस्ट फ्रेंड नंबर वन आहे आणि तो त्याच स्थानावर कायम राहील!
सलमान आणि कॅटरिनाच्या मैत्रीला नुकतीच 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. कॅटरिना याबाबत सांगते की, सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेक जण आपल्याकडे किंवा इतरांकडे मैत्रीसाठी हात पुढे करतात; पण त्यांच्या मैत्रीत स्वार्थ दडलेला असतो. सलमानची मैत्री याहून खूप वेगळी आहे. कारण त्यामध्ये मागणं काहीही नसतं!
View this post on Instagram
Interview, interviews and some more interviews. #Bharat @bharat_thefilm @katrinakaif