सिनेसृष्टी असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र; करिअरच्या वाटेवर योग्य ते बदल योग्य वेळी करणे खूप आवश्यक असते. अन्यथा करिअरची दिशा चुकली की त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. अभिनेत्री रिचा चढ्ढाने हे अचूक ओळखले. त्यामुळेच तिने खूप लवकर आपल्या ऍक्टिंग ट्रॅकला एक नवी दिशा दिली.
“फुकरे’ या चित्रपटानंतर रिचाने ओळखले होते की, साईड ट्रॅकवरून चालणे आपल्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीच्या दृष्टीने हितावह आहे. त्यानुसार तिने अंमलबजावणीही सुरू केली.
“पंगा’ या चित्रपटात रिचा कबड्डी प्रशिक्षिकेच्या भूमिकेत झळकत असून तिने या व्यक्तिरेखेला चांगला न्याय दिला आहे.
स्वतः रिचादेखील सांगते की, फुकरे नंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मला लक्षात आले की, आपण थोडा ट्रॅक बदलण्याची गरज आहे. त्याचे चांगले रिझल्टस् मला मिळाले.
अनावश्यक किंवा फारसा दम नसलेले लीड रोल करण्यापेक्षा सशक्त, उठावदार साहाय्यक भूमिका करण्यात मला काहीच गैर वाटत नाही. उलट आनंदच मिळतो, असं रिचा सांगते. आताही रिचाकडे “अभी तो पार्टी शुरू हुई है’, “घुमंतु’, “शकिला’, “भोली पंजाबन’ यांसारखे तीन-चार चित्रपट असून त्यामध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारणार आहे.