जोकोविचला मिनिटाला मिळाले अडीच लाख रूपये
मेलबर्न : सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने ८ वे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदाबदल त्याला ४१ लाख आॅस्ट्रेलियन डाॅलरचे पारितोषिक मिळाले. भारतीय रूपयांमध्ये बोलायचे तर जोकोविचला जवळपास २० कोटी रूपये मिळाले.
The king has returned 👑
After almost four hours, @DjokerNole def. Dominic Thiem 6-4 4-6 2-6 6-3 6-4 to claim his eighth Australian Open crown.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/EJOKBy040s
— #AusOpen (@AustralianOpen) February 2, 2020
स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून अंतिम लढतीपर्यंत मिळून त्याने ८४३ मिनिटे कोर्टवर घालविली. याचा हिशोब केला तर जोकोविचला प्रत्येक मिनिटाचे जवळपास अडीच लाख रूपये मिळाले. जोकोविच शाकाहार, योग आणि ध्यानधारणा याला महत्व देतो. त्याने या विजेतेपदाचे सारे श्रेय याच आहार-विहाराला दिले.
Gr8⃣ness
🏆 2008
🏆 2011
🏆 2012
🏆 2013
🏆 2015
🏆 2016
🏆 2019
🏆 2020#AusOpen | #AO2020 | @DjokerNole pic.twitter.com/g0j8o3gZA7— #AusOpen (@AustralianOpen) February 2, 2020
साल २००८ साली प्रथमच त्याने आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. त्यानंतर २०११ पासून २०१६ पर्यत २४ पैकी ११ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. दुखापतीतून सावरण्यासाठी व मन:शांतीसाठी त्याने अध्यात्माचा आधार घेतला. त्यामुळेच माझा संयम वाढल्याचे जोकोविचने व्यक्त केले.