जयपूर : भारतीय लष्करातील मेजर महिलेवर सहकाऱ्याने लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणाचा फेर तपास करण्याचे आदेश राजस्थानमधील एका न्यायलयाने दिले आहेत. या महिलेने भीमगंजमंडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान दिले आहे. न्यायलयाने याबाबत 22 जानेवारीला सुनावणी ठेवली आहे.
या प्रकरणात आरोपी असणाऱ्याला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. तर पिडीता ही लष्कराच्या आभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे. तर आरोपी हा अलहाबाद येथे लष्कराच्या पुरवठा विभागात लेफ्टनंट कर्नल आहे. ही घटना घडली त्यावेळी तो मेजर होता.
दरम्यान, लष्कराचे प्रवक्ते अमन आनंद यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. मी खूप प्रयत्न करूनही मला याबाबत माहिती मिळू शकली माही. याबाबत काही तपशील मिळाल्यास मी आपणास देईन, असे ते म्हणाले.
पिडितेने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कोटा दादवाडा लषकरी छावणीतील त्यांच्या निवासस्थानी 24 जून 2018ला पिडिता घरी एकट्या होत्या. त्यावेळी रात्री दोनच्या सुमारास हा अधिकारी त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरला. पिडितेला बेडवर जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला. त्याने अयोग्य स्पर्श केले. पिडितेने त्याच्याशी लढायला सुरवात केल्यानंतर तो गॅलरीतून उडी टाकून पळून गेला.
दुसऱ्या दिवशी हा अधिकारी आपल्या पत्नीसह आला. त्याने माफी मागितली. त्यावेळी सर्व संभाषण मी रेकॉर्ड केले आहे. मात्र ते संभाषण पोलिसांनी पुरावा म्हणून ठेवले नाही. त्याविरोधात पिडितेने याचिका दाखल केली आहे.