बाधितांची संख्या 17 हजार 205
बिजींग – चीन मधील करोना विषाणुंच्या बाधेतून मरण पावलेल्यांची संख्या आता 361 झाली असून करोना बाधितांची संख्या 17 हजार 205 इतकी झाली आहे. करोना रोगाच्या प्रसाराविषयीची दैनंदिन माहिती चीनच्या राष्ट्रीय अरोग्य आयोगाकडून देण्यात येते. त्यांनी म्हटले आहे की काल दिवसभरात देशाच्या विविध भागातून या रोगाचे 2829 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या आता 17 हजाराच्यावर गेली आहे.
या रोगाने काल दिवसभरात विविध रूग्णालयांमध्ये एकूण 57 रूग्ण दगावले त्यामुळ मृतांची संख्या 361 झाली आहेत. रविवारी ठिकाणठिकाणच्या रूग्णालयांमध्ये 5173 नवीन संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बाधित रूग्णांपैकी 186 रूग्ण अत्यवस्थ असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.