शहापूर: शहापूर तालुक्यातील हिवरास (दोऱ्याचा पाडा) येथील भगवान सांबरे रुग्णालय संचलित हेमंत सुपर स्पेशालिटी कर्करोग रुग्णालयाचे भूमिपूजन शरद पवार यांनी केली. ठाणे-मुंबईपासून दूर वसलेल्या पाडे, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी ह्या अद्ययावत प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज रोवल्याचे पवार म्हणाले. तसेच या रुग्णालयात ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांना परवडेल अशा खर्चात वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, अशी खात्री असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आदिवासी पाड्यावर जेवणाचा आनंद लुटला. देशातील बडे नेते घरी जेवायला आल्यामुळे आदिवासी कुटुंबियांना विशेष आनंद झाला होता. शरद पवारांनी आदिवासी कुटुंबायांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. आणि दुपारचे जेवण देखील तेथेच केले.
सदर कार्यक्रमात आदिवासी नृत्यू सुरु असतांना शरद पवार स्वतः आपल्या मोबाईलमध्ये तो क्षण टिपत होते. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचे विशेष कौतुक केले. तसेच पवारांनी कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण न करता आपल्या भाषणात फक्त आदिवासी समाजाच्या समस्यांचे निराकरण केले.