माउंट माउंगनुई (न्यूझीलंड) : फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करत भारताने मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७ धावांनी पराभव करत विजय मिळविला आहे. या विजयासह भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. ५ सामन्यांच्या टी-२० क्रिकेट मालिकेत भारताने ५-० असे निर्भेळ यश मिळविले आहे.
5️⃣ – 0️⃣ 👌🏻😎🔝🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #TeamIndia #NZvIND pic.twitter.com/pn0qTiwDHR
— BCCI (@BCCI) February 2, 2020
विजयासाठी १६४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघास २० षटकांत ९ बाद १५६ धावांपर्यतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून फलंदाजीत राॅस टेलरने ४७ चेंडूत (५ चौकार व २ षटकार) सर्वाधिक ५३ तर टिम सीफर्टने ३० चेंडूत (५ चौकार व ३ षटकार) ५० धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. या व्यतिरिक्त काॅलिन मुनरोने १५(६) आणि ईश सोढीने नाबाद १६(१०) धावा केल्या.
5th T20I. It's all over! India won by 7 runs https://t.co/3a7zBdAcuu #NZvInd
— BCCI (@BCCI) February 2, 2020
भारतीय संघाकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ४ षटकात १२ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. नवदीप सैनीने ४ षटकात २३ धावा देत २ आणि शार्दुल ठाकूरने ४ षटकात ३८ धावा देत २ गडी बाद केले. वाॅशिंग्टन सुंदरने ३ षटकात २० धावा देत १ गडी बाद केला.
It's a clean sweep!
India win the T20I series 5-0 🎉 #NZvIND pic.twitter.com/Hc8HX9w4GS
— ICC (@ICC) February 2, 2020
भारताची एेतिहासिक कामगिरी
आतापर्यंत न्यूझीलंडला टी-२० मालिकेत न्यूझीलंडमध्ये ५-० ने कोणीही हरविलेले नव्हते. पण आज भारतीय संघाने मालिकेतील ५ वा सामना जिंकत ही ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच ५-० ने टी-२० मालिका जिंकणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.
KL Rahul named Player of the Series. #NZvIND pic.twitter.com/9lHEpyByDi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 2, 2020
बुमराह सामनावीर तर लोकेश राहुल मालिकावीर
जसप्रीत बुमराह आजच्या सामन्याचा मानकरी ठरला. यष्टीरक्षक व फलंदाज लोकेश राहुल मालिकावीर ठरला. राहुल ने मालिकेत पहिल्या ते पाचव्या सामन्यात अनुक्रमे ५६, नाबाद ५७, २७, ३९ आणि ४५ अशा एकूण २२४ धावा केल्या.
163 on the board. Can #TeamIndia defend the target? 🧐🧐 #NZvIND pic.twitter.com/GlS4lqIoJL
— BCCI (@BCCI) February 2, 2020
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर भारतीय संघाने २० षटकांत ३ बाद १६३ धावा केल्या. भारतीय संघाकडून रोहित शर्माने ४१ चेंडूत ( ३ चौकार व ३ षटकार) ६० तर लोकेश राहुलने ३३ चेंडूत (४ चौकार व २ षटकार) ४५ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. संजू सॅमसन २ तर शिवम दुबे ५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मनीष पांडेने ४ चेंडूत (१ चौकार व १ षटकार) नाबाद ११ आणि श्रेयस अय्यरने ३१ चेंडूत (१ चौकार व २ षटकार) नाबाद ३३ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १६३ पर्यंत नेली.
FIFTY!@ImRo45 brings up his 21st T20I half-century off 36 deliveries.
Live – https://t.co/3a7zBdRNm2 #NZvIND pic.twitter.com/N1nRDSvNjo
— BCCI (@BCCI) February 2, 2020
न्यूझीलंड संघाकडून स्काॅट कुग्गलिनने ४ षटकात २५ धावा देत २ तर हेमिश बेनेटने ४ षटकात २१ धावा देत १ गडी बाद केला.