पोशेस्ट्रूम (द.आफ्रिका) : ताडीवानाशे मरूमानी याच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या ‘क’ गटाच्या साखळी सामन्यात स्काॅटलंडवर ८ विकेटनी विजय मिळविला आहे.
Zimbabwe win and seal third spot in Group C!
Sakhumuzi Ndlela the star with the ball taking 4/27 and Tadiwanashe Marumani hit 85 👏 #U19CWC | #ZIMvSCO | #FutureStars pic.twitter.com/kzPQGbbD3P
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 25, 2020
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना स्काॅटलंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होत. स्काॅटलंडने प्रथम फलंदाजी करताना ३७.२ षटकात सर्वबाद १४० धावा केल्या होत्या. स्काॅटलंडकडून फलंदाजीत केस सज्जादने ६८ आणि डेनियल केयर्न्सने २८ धांवाची खेळी केली. झिम्बाब्वेकडून गोलंदाजीत सखुमुजी एंडलेलाने सर्वाधिक ४ तर डिओन मायर्स आणि ताडीवानाशे न्यानगनी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
Scotland have been bowled out for 140.
Kess Sajjad the last man to depart for an excellent 68 👏 #U19CWC | #ZIMvSCO | #FutureStars pic.twitter.com/c017tvl0Lm
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 25, 2020
प्रत्युत्तरात विजयासाठीचे १४१ धावांचे आव्हान झिम्बाब्वेने १७.१ षटकांत २ बाद १४६ धावा करत सहज गाठले. झिम्बाब्वेकडून फलंदाजीत वेस्लेने १४ तर ताडीवानाशे मरूमानीने ५४ चेंडूत (११ चौकार व ४ षटकार) ८५ आणि मिल्टन शुम्बाने ३८ चेंडूत (३ चौकार व १ षटकारा) नाबाद ३७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिल. स्काॅटलंडकडू गोलंजदाजीत शौन फिशर काॅफ आणि जैसपर डेविडसनने प्रत्येकी १ गडी बाद केला.