शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य करुन उदयनराजे यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच समर्थकांनी शहरातून निषेध रॅली, राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
संजय राऊत यांनी साताऱ्याच्या राजघराण्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर साताऱ्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले. गुरुवारी राजे समर्थकांसह सातारकरांनी शहरातून दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचा नामोल्लेख असणारे फलक अडकवून काढलेली मिरवणूक
संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करुन निषेध व्यक्त करताना भाजप पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक.
संजय राऊत यांनी साताऱ्याच्या राजघराण्याविषयी आक्षेपार्ह विधान केलेल्या गुरुवारी सातारा बंदची हाक देण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात जागोजागी तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.
एरव्ही खाद्य पदार्थांच्या स्टॉल आणि ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेल्या राजवाडा चौपाटीवर गुरुवारी बंद मुळे शुकशुकाट होता.
खासदार संजय राऊत यांनी राजघराण्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर गुरुवारी साताऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.