हे पुस्तक म्हणजे कार्यकर्त्याचा खोडसाळ पणा
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी पुस्तकाच्या माध्यमातून केल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. खासदार संभाजीराजे यांनी या पुस्तकाबाबत आपला राग व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती.
राऊत यांच्या प्रतिक्रियेवर आता खासदार संभाजीराजे यांचे समर्थक योगेश केदार यांनी राऊत यांच्यावर टीका करत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी माहिती घेऊन बोलावं आपण काय महाभारतातील संजय नाही हे लक्ष्यात घ्यावं अस केदार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरील वाद काही थांबायचे नाव घेत नाहिये. दिल्लीमध्ये भाजप नेत्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले.
यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर यावरुन प्रचंड विरोध पाहायला मिळतोय. याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित पुस्तकाची विक्री तात्काळ बंद करावी असे देखील त्यांनी म्हटले आहे