Lok Sabha Election 2024 – आगामी लोकसभा निवडणुकी येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकांसाठी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही निश्चित झालेला नसला तरी कोल्हापूर लोकसभेचा तिढी सुटला आहे.
या जागेवर छत्रपती शाहू महाराज यांनी ही जागा लढवावी असे महाविकास आघाडीचे मत आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून कोल्हापूरमध्ये उभे राहणार हे पाहावे लागेल. अशातच छत्रपती शाहू महाराज यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट माझ्यासमोर असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी आज स्पष्ट केले. । Sambhaji Raje
कोल्हापूर येथील न्यू पॅलेसवरील कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, अजूनही महाविकास आघाडीकडून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. परंतू छत्रपती शाहू महाराज लोकसभेला उभे राहणार असून, । Shahu Chhatrapati Maharaj
त्यांची आणि लोकांचीही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची आहे. त्यांच्या विजयापुढे माझ्या सर्व आकांक्षा दुय्यम असून आमचं घर किती एकसंघ आहे हे दाखवण्यासाठीच नुकताच माझा आणि महाराजांचा एक फोटो सोशल मीडीयावर शेअर केला होता.
आधीच्या निवडणुकीचा संदर्भ देतना संभाजीराजे म्हणाले की, 2009 साली जे धक्के मी खाल्ले आहेत त्यातून मी बरेच शिकलो आहे, त्यामुळे तसा प्रकार पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे आम्ही एक अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून पाहतो. ते दिल्ली गाजवतील असा मला विश्वास आहे.
राजकारणात आरोप प्रत्यारोप चालणार आहेत, परंतू आमच्याकडेही शस्त्रे आहेत. मी दिल्ली पाहिली आहे. त्यामुळे मी बोलायला सुरूवात केली तर घोटाळा होईल, असा शब्दात संभाजीराजेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. तसेच आमच्या वडिलांचे वय जे विचारतात त्यांना मोदींचे वय माहिती नाही का? असा सवालही यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. । Shahu Chhatrapati Maharaj