जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करत भाजपला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 17 बंडखोर जिल्हा परिषद सदस्यांना पक्षाने दणका दिला आहे.
या सर्व बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 17 जानेवारीला होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडीचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. विद्यमान अध्यक्षा अस्मिता कांबळेसह माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी उपाध्यक्ष तथा भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा समावेश आहे. राणा पाटील समर्थक बंडखोर सदस्यांनी भाजपला मतदान केले होते.