मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल संकल्प मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी 1 हजार 475 रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
या शिबिराचे आयोजन अटल बिहारी वाजपेयी विचार मंच आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंदाराणी पाटील, भाजपचे लोकसभा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, संजय थोरात, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, सरपंच दत्ता गांजाळे, युवराज बाणखेले, कैलास राजगुरु, सुनील खिंवसरा, तहसीलदार रमा जोशी, बाळासाहेब बाणखेले, भानुदास काळे, सुनील बाणखेले, डॉ.ताराचंद कराळे, अरुण गिरे, विजय पवार उपस्थित होते.