मंचर -अवसरी फाटा-गोरक्षनाथ टेकडी (ता. आंबेगाव) येथे खेतानाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नुकतेच अभिवादन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गोरक्षनाथ मंदिरात होमहवन कार्यक्रम झाला. त्यानंतर खेतानाथजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जयराम मोटवानी, सुरेश भोर, किशोर अडवानी, उपसभापती संतोष भोर, भुतनाथ महाराज यावेळी उपस्थित होते.
बाबा खेतानाथजी महाराज यांच्या मूर्तीचे व योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्वरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नाथपंथीय नवनाथ झुंडीचे महंत योगी किसननाथजी महाराज, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, उद्योजक मिलिंद खुडे, दत्ता थोरात, गोरखनाथ शिंदे, सुरेश निघोट यांच्या हस्ते झाले.