पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने आयोजित ‘१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ चे उदघाटन गुरुवारी दि. ९ जानेवारी २०२० ला सायंकाळी पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे पार पडले. यादरम्यान ‘वैशाली जाधव’ हिने बहारदार लावणी सादर केली. यावेळी लावणीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह भरभरून प्रतिसाद दिला.
महोत्सवाचे उदघाटन सांस्कृतिक कार्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी दीपप्रज्वलन करताना मुरलीधर मोहोळ, रवी गुप्ता, मुक्ता बर्वे, सुबक भावे, डास. जब्बार पटेल देखील उपस्थित होते.
महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महापौर मुरलीधर मोहोळ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी यांच्यासह प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता सुबोध भावे या वेळी उपस्थित होते.