नवीन वर्षांमध्ये जर तुम्ही नवा स्मार्टफोन अथवा मोबाईल ऍक्सेसरीज घ्यायच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. येत्या १९ ते २२ जानेवारी दरम्यान जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अमॅझॉनने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी ‘द ग्रेट इंडियन सेल’चे आयोजन केले असून या सेलमध्ये स्मार्टफोन्ससह अनेक इलेक्ट्रॉनिक एक्सेसेरीजवर ४०% पर्यंतची सूट मिळणार आहे. २०२० वर्षातील अमॅझॉनतर्फे जाहीर करण्यात आलेला हा पहिलाच सेल असून यामध्ये ओप्पो, सॅमसंग, शाओमी, रियलमी, एलजी आणि व्हिवो अशा नामांकित ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर सूट मिळेल.
एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी १०% अधिक डिस्काउंट ‘द ग्रेट इंडियन सेल’ हा एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी जास्तच स्पेशल असणार असून एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना या सेल दरम्यान एक्स्ट्रा १०% इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येणार आहे.
‘या’ स्मार्टफोन्सवर आहेत खास ऑफर ‘द ग्रेट इंडियन सेल’ दरम्यान रेडमी नोट 8 प्रो, आयफोन एक्सआर, सॅमसंग गॅलेक्सी M30 आणि Vivo U20 या स्मार्टफोन्सच्या किमतींवर सूट मिळणार असल्याची माहिती आहे. तसेच वनप्लस ७ सेरीजवर १२ महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय व स्मार्टफोन एक्सेंज केल्यास खास सवलती मिळणार आहेत.
‘द ग्रेट इंडियन सेल’ मध्ये मिळणार असणाऱ्या सर्व सवलतींबाबत अमॅझॉन टप्याटप्याने माहिती देणार असल्याने स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी थोडी वाट पाहणेच फायद्याचे ठरणार आहे.