अनेकवेळा आपण चित्रपटांमध्ये वस्तूंची तस्करी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लुप्त्या पाहत असतो. बुटाच्या सोलमधून अथवा लहान मुलांच्या खेळण्यांमधून हिऱ्यांची तस्करी करणारा व्हिलन आपण अनेक बॉलिवूडपटांमधून पहिला असेलच. मात्र युगांडा येथील महिलेने रिअल लाईफमध्ये तस्करीसाठी लढवलेली शक्कल चक्रावणारी आहे.
त्याचं झालं असं की, युगांडा सरकारने रंग उजळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही सौंदर्य प्रसाधनांवर बंदी घातली आहे. अशा या बंदी लादण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधनांची उगांडामध्ये विविध मार्गाने तस्करी होत असते मात्र यावेळी तस्करीसाठी वापरलेला आगळावेगळा मार्ग पाहून पोलीस देखील बुचकुळ्यात पडले आहेत. सौंदर्य प्रसाधनांची तस्करी करण्यासाठी या महिलेने चक्क बेबी सूटचा वापर केला आहे!
याबाबतची अधिकृत माहिती युगांडा महसूल विभागाने आपल्या ट्विटर खात्यावरून दिली असून या प्रकरणाचे फोटोज देखील शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये लहान मुलांना घालण्यात येणाऱ्या बेबी सूटमध्ये सौंदर्य प्रसाधने भरल्याचे दिसत असून ज्या प्रमाणे आपण आपल्या लहान मुलांना खांद्यावर घेतो अगदी त्याच प्रकारे सदर महिला कॉस्मेटिकने भरलेला बेबी सूट खांद्यावर घेताना दिसत आहे.
काही महिला शेजारील देशातून सौंदर्य प्रसाधनांची तस्करी करण्यासाठी बेबी सूटचा वापर करत असल्याची माहिती येथील महसूल विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या उत्पादनांमध्ये असलेल्या पारा आणि हायड्रोक्विनोन या घातक पदार्थांमुळे युगांडा सरकारने २०१६ पासून रंग निखरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांवर बंदी घातली आहे.
On face value, it's a mother carrying a child on her back.
In reality,it's a smuggler bringing in carefully concealed banned cosmetics from DRC.
Intel had been gathered about this smuggling mode.Mpondwe enforcement nabbed her as she crossed via a shallow point of River Rubiiha. pic.twitter.com/I3gQVO6e4k
— Uganda Revenue Authority (@URAuganda) January 8, 2020