थेऊर येथील कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांचे आश्वासन
थेऊर (वार्ताहर) – थेऊर व परिसरातील विकासासाठी सातत्याने भरीव मदत करणार असून मतदार संघातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या ओझर, लेण्याद्री आणि रांजणगाव या देवस्थानांनाही निधी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी श्रीक्षेत्र थेऊर येथे सांगितले.
थेऊर (ता. हवेली) येथे नवीन भक्तनिवास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अष्टविनायकातील दुसरा मानाचा गणपती श्री चिंतामणी गणपती देवस्थान असल्याने ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार, ग्रामविकास विभागाकडून, थेऊरला तिर्थक्षेत्राचा “ब’ वर्ग दर्जा देण्यात आला. हा दर्जा प्राप्त देवस्थानांना, शासन विकासकामे करण्यासाठी 2 कोटी रूयये निधी देते. याच निधीतून थेऊर येथे भक्तनिवास कामाचे भुमीपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, महाराष्ट्र साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, हिरामण काकडे, मंगेश चिवटे, दिलीप वाल्हेकर, उपसभापती युगंधर काळभोर, शिंदवणेचे सरपंच आण्णा महाडिक, अमित कांचन, सरपंच संगीता तारू, उपसरपंच विलास कुंजीर, मा.सरपंच छाया काकडे, सुरेखा कुंजीर, नंदा कुंजीर, मा.उपसरपंच आप्पासाहेब काळे, शहाजी जाधव, भरत कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, नितीन कुंजीर, राहुल कांबळे, काशीनाथ कोळेकर, गजानन आगलावे, विनोद माळी, संगीता गावडे, गंगुबाई चव्हाण, पल्लवी साळुंके, मिनाक्षी कांबळे, दिपाली घुगे, ग्रामसेवक बी. आर. कांबळे, सुदाम गावडे, मा.संचालक रामभाऊ कुंजीर, विश्वस्त आनंद तांबे हे उपस्थित होते. आमदार पवार व खासदार कोल्हे यांनी याबाबतचे शिफारस पत्र ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले. ग्रामस्थांच्या वतीने तात्यासाहेब काळे व हिरामण काकडे, युवराज काकडे यांनी स्वागत केले.