बार्सिलोना : लिओनेल मेस्सीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने अलावेस संघाचा ४-१ ने पराभव करत ला लीगा फुटबाॅल स्पर्धेत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
⚽ #Messi
⚽ @LuisSuarez9
⚽ @AntoGriezmann
⚽ @kingarturo23 #ForçaBarça 🔵🔴 https://t.co/huAopf9rG8— FC Barcelona (@FCBarcelona_es) December 21, 2019
शनिवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोनाकडून अँटाॅइन ग्रिझमनने १४ व्या, आर्टुरो व्हिडालने ४५ व्या, लिओनेल मेस्सीने ६९ आणि लुइस सुआरेझने ७५ व्या मिनिटाला गोल केला तर अलावेस संघांकडून पियरे पोन्सने ५६ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
मेस्सीचा पुन्हा एकदा विक्रम
दरम्यान, ला लीगा स्पर्धेत याच सामन्यात अलावेसविरूध्द खेळताना लिओनेल मेस्सीने ६९ व्या मिनिटास गोल करत या वर्षातील वैयक्तिक ५० वा गोल नोंदवला.
Leo #Messi has scored at least 5️⃣0️⃣ goals (club & country) in 9 of the last 10 calendar years!
2010 6️⃣0️⃣
2011 5️⃣9️⃣
2012 9️⃣1️⃣ 🤯
2013 4️⃣5️⃣
2014 5️⃣8️⃣
2015 5️⃣2️⃣
2016 5️⃣9️⃣
2017 5️⃣4️⃣
2018 5️⃣1️⃣
2019 5️⃣0️⃣— FC Barcelona (@FCBarcelona) December 21, 2019
यासह त्याने २०१९ मध्ये गोलचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने सलग ‘९’व्या वर्षी एका वर्षामध्ये ५० गोल नोंदवण्याचा पराक्रम केला आहे.