नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी आणि बस्तवाड या गावाच्या पुनरूध्दारासाठी अमेरिकेचे न्यू जर्सीचे राजेश पांड्या यांनी सीमेंटच्या 150 बॅगा देण्याची घोषणा केली आहे. डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनने ही दोन्ही गावे दत्तक घेतली असून त्यांच्या पुनरूध्दाराचे कार्य जोमात सुरू आहे.
अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील राजेश पांड्या यांनी निलेवाडी आणि बस्तवाड गावाचे बांधकाम करण्यासाठी सीमेंटच्या 150 बॅग्स देवू केल्या आहेत. ते एल अँड टी इंफोटेकमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत.
महाराष्ट्रात अलिकडेच आलेल्या महापुराने कोल्हापूर आणि सांगली जिल्हात थैमान घातले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी आणि बस्तवाड हे गाव पाण्यात बुडाले. तीस टक्के घरे पडली होती आणि 70 टक्के घरांना भेगा पडल्या होत्या.
जनावरांचा मृत्यू झाला. जनावरांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना तिसया माळ्यावर नेण्यात आले होते. निलेवाडी आणि बस्तवाड या दोन्ही गावांना पुर्वपदावर आणण्याची जबाबदारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनने उचलली आहे. राजेश पांड्या यांनी यासाठी सिमेंटच्या बॅगा देवू केल्या आहेत.