पुणे: थर्डआय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पाथ स्पोर्टस् संघाचा तर पीएमपी ग्रुप संघाने नाशिक स्पोर्टस् ऑड फिटनेस अकादमी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत रोहन दामलेच्या कामगिरीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पाथ स्पोर्टस् संघाचा 65 धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 20 षटकात 2 बाद 238 धावांचा डोंगर रचला. 238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यश खळदकर व दिव्यांग हिंगणेकर यांच्या गोलंदाजीने पाथ स्पोर्टस् संघाचा डाव 20 षटकात 7 बाद 173 धावांत रोखला.
दुसऱ्या लढतीत पीएमपी ग्रुपने नाशिक स्पोर्टस् ऑड फिटनेस अकादमीचा 58 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.