पुणे: अमोल बुचडे स्पोर्टस् फाउंडेशन, मुंबई बॉईज, केएचएस, अभिनव संघांनी सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी आगेकूच कायम राखली.
या स्पर्धेत बीव्हीबी संघाने मिलेनियम संघाला 25-20, 25-21 असे पराभूत करताना विजयी आगेकूच कायम राखली. अमोल बुचडे स्पोर्टस् फाउंडेशन संघाने नालंदा हायस्कूल संघाला 25-20, 25-23 असे पराभूत करतना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. याच गटातील अन्य लढतीमध्ये मुंबई बॉईज संघाने न्यू लाईफ स्पोर्टस् क्लब संघाला 25-10, 25-9 असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच राखली.
केएचएस संघाने एसपीएम संघाला 25-18, 19-25, 15-11 असे पराभूत करताना स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. मिलेनियम हायस्कूल संघाने सिम्बायोसिस संघाला 25-6, 25-9 असे पराभूत केले. अभिनव संघाने नालंदा हायस्कूल संघाला 25-17, 25-12 अये पराभूत करताना संघाच्या विजयावर मोहोर लावली.
सिम्बायोसिस संघाने जी. जी. शहा हायस्कूल संघाला 25-19, 25-19 असे पराभूत केले. अन्य लढतीमध्ये अमोल बुचडे स्पोर्टस् फाउंडेशन संघाने बीव्हीबी संघाला 25-17, 25-17 असे पराभूत केले. डी. डब्ल्यू. स्पोर्टस् अकादमी संघाने सिम्बायोसिस संघाला 25-17, 17-25, 15-11 असे पराभूत करताना विजय साकारला.