सलमानच्या “राधे’मध्ये खलनायकाचा रोल करणारा रणदीप हुडा याच सिनेमातील एका “ऍक्शन सिक्वेन्स’च्यावेळी जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला थोडीशी दुखापत झाली असून कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये त्याला लगेच हलवण्यात आले.
View this post on Instagram
दोन दिवस हॉस्पिटलमध्ये घालवल्यावर नुकताच तो घरी परत आला, तेंव्हा ही बाब उघड झाली. “राधे’च्या ऍक्शनसाठी सलमानने एका कोरियन टीमला पाचारण केले आहे. त्या टीमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिनेमामध्ये एकूण 4-5 ऍक्शन सिक्वेन्स असणार आहेत.
यामध्ये ऍक्शन स्टंटचे वेगवेगळे प्रकार अवलंबलेले असणार आहेत. सलमानचा फेव्हरेट शर्ट काढून उघड्या अंगाने फाईटचा क्लायमॅक्स सीनही असणार आहे. हा सीन अर्थात रणदीप आणि सलमान यांच्यावर चित्रीत झालेला असणार आहे. रणदीप हुडा प्रथमच नकारात्मक रोलमध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्याशिवाय इम्तियाझ अलीच्या “आजकल’, “रात ऑन हायवे’ आणि “अ सुटेबल बॉय’ या वेबसिरीजमध्येही तो असणार आहे.
“आजकल’मध्ये त्याच्याबरोबर सारा अली खान आणि कार्तिक आर्यन असतील, तर “अ सुटेबल बॉय’ही वेबसिरीज झोया हुसैन आणि मीरा नायरची निर्मिती असणार आहे. ही वेबसिरीज एक थ्रिलर स्टोरी असणार आहे.