मुंबई – बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच अभिनेता ‘सलमान खान’चा बहुचर्चित चित्रपट “राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ काल (दि. 13) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आतापर्यंत सलमानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
दरम्यान, ‘राधे’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आणि यानंतर अवघ्या काही तासांतच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला. त्यामुळे भाईजानच्या चाहत्यांमध्ये काहीसे संतापाचे चित्र दिसत आहे. अनेकांनी चित्रपट लीक करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
समीक्षकांना ‘राधे’ चित्रपट फार भावला नाही. पण सलमानच्या चाहत्यांनी मात्र चित्रपट डोक्यावर घेतला आहे. चित्रपटात सलमान खान सोबत अभिनेत्री दिशा पाटनी मुख्यभूमीकेत दिसली आहे.दिशा आणि सलमान यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. या आधी हे दोघंही ‘भारत’ चित्रपटात एकत्र झळकले होते.
“राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं आहे. यात अभिनेता रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.