भारतात चांगले यश कमावल्यानंतर कंगणा रणावतचा “मणिकर्णिका-क्वीन ऑफ झांसी’ आता जपानमध्ये रिलीज होणार आहे. पुढच्या वर्षी 3 जानेवारीला हा सिनेमा जपानमध्ये रिलीज होणार आहे. त्यानंतर महिन्याभराने झी स्टुडिओ इंटरनॅशनलच्यावतीनेही तो रिलीज केला जाणार आहे.
घोड्यावर बसलेली रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशभुषेतील कंगणा रणावत या रोलसाठी खूप लोकप्रिय झाली होती. तिचे आवेशाचे पोस्टरही प्रचंड लोकप्रिय झाले होते. या सिनेमाच्या निमित्ताने कंगणाने प्रथमच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली होती. याच पोस्टरच्या आधारे या सिनेमाची लोकप्रियता जपानमध्ये सध्या शिगेला पोहोचली आहे.
“मणिकर्णिका’मध्ये कंगणाच्या बरोबर अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, सुरेश ओबेरॉय, डॅनी आणि झिशू सेनगुप्ता हे मुख्य भूमिकांमध्ये आहेत. भारतात 25 जानेवारीला रिलीज झाल्यावर “मणिकर्णिका’ने केवळ 5 दिवसात 50 कोटी रुपयांची कमाई केली होती.
सध्या कंगणा “पंगा’च्या रिलीजची वाट बघते आहे. त्यात ती कबड्डी खेळताना दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर रिचा चढ्ढा, पंजाबी गायिका जस्सी गिल आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. “पंगा’ पुढच्या वर्षी 24 जानेवारीला रिलीज होणार आहे.