हैदराबाद : काही वृत्त वाहिन्या आणि सोशल मिडियावरील साईटवर हैदराबाद येथील निर्भयाची ओळख पटविल्याबद्दल आणि आरोपींचे छायाचित्र प्रसारित केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावली. हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आदेश त्यात दिले आहेत.
काही मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रोनिक माध्यमांनी या प्रकरणाच्या तपासात बाधा पोहचवू शकणारी माहिती प्रकाशित केली आहे. त्यामुळे हे प्रकार थांबवण्याची नोटीस फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149नुसार नोटीस बजावली आहे. काही जण सातत्याने या प्रकरणातील आरोपींची तसेच पिडितेची छायाचित्रे प्रकाशित करत आहेत. त्यांनी ते तताडीने थांबवावे, असे आवहन पोलिसांनी केले आहे.
काही जणांनी मृत महिलेला न्याय देण्यासाठी समाज माध्यमांतून मोहिम राबवली आहे. त्यात त्या महिलेच्या नावाचा ऊउल्लेख नसावा. त्याऐवजी हॅशटॅग जस्टीस फॉर दिशा हा हॅशटॅग चालवावा असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे ही बाब लक्षात घेऊन दखलपात्र गुन्हा नोंद होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.