महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशनच्या वतीने उपक्रम
दावडी-महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही /एड्स जनजागृती मेगा प्रभातफेरी काढण्यात आली. या सप्ताह अंतर्गत महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि.चे सनी लोपेज, मेल्व्य्न मुननुस्वम्य, रमेश पाटील, अमोल गीते, सैपन ताम्बोली, महेश थोरात आणि 900 अधिकारी व स्वयंसेवक यांच्यासह 57 शाळा- महाविद्यालयांतील 22 हजार विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण ता. खेड यांच्या संयुक्त विद्यमाने 2016 पासून संपूर्ण खेड तालुक्यात एच.आय.व्ही/एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात आहे. सदर कार्यक्रमांतर्गत एच,आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व बालकांसाठी पुनर्वसन अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात असतात. तसेच जनजागृती म्हणून वर्षभर शाळा, महाविद्यालय, वस्ती, गाव, औद्योगिक वसाहत, कंपनी मध्ये प्रतिबंधात्मक जनजागृती केली जात असते. संस्थेच्या वतीने दर वर्षी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून समाजातील एच.आय.व्ही. बाबतचे गैरसमज, भीती, अज्ञान, भेदभाव, कलंक दुर करण्याचा प्रयत्न तसेच प्रतिबंधात्मक काळजी विषयी मार्गदर्शन केले जाते.
आय.टी.आय. चांडोली शासकीय विद्यालय, जवाहर विद्यालय- चास कमान, श्री महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय – वाफगाव, कै. बाबुराव गेनुजी पिंगळे पाटील विद्यालय- गुळाणी, कला वाणिज्य महाविद्यालय- डेहेणे, श्री भीमाशंकर माध्यमिक विद्यालय-आव्हाट, श्री मळूदेवी माध्यमिक विद्यालय-वाळद, कर्मवीर भाऊराव विद्यालय-वाडा, श्री सिद्धेश्वर विद्यालय-कडधे, इंदिराजी माध्यमिक विद्यालय-मोई, भैरवनाथ विद्यालय-कुरुळी, आंनद इंग्लिश मिडियम स्कूल-कुरुळी, समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल-चिंबळी, श्री सिद्धेश्वर विद्यालय-वेताळे, भैरवनाथ माध्यमिक व उच्चामाध्यमिक विद्यालय-दोंदे, आदर्श विद्यालय-शिरोली, भाऊसाहेब राऊत विद्यालय-घोटवडी, श्री शिंगेश्वर विद्यालय-कुडे, सरस्वती विद्यालय- औदार, मामासाहेब माहोल प्रशाला-वाशेरे, न्यू इंग्लिश स्कूल-कोहिंडे, समर्थ स्कूल व कॉलेज -खराबवाडी, श्रीपतीबाबा महाराज माध्यमिक विद्यालय-महाळुंगे, रेणुका विद्यालय-रासे, आदर्श विद्यालय-आंबोली, मोहोळ माध्यमिक प्रशाला-पाळू, कुंडेश्वर विद्यालय-पाईट, श्री भैरवनाथ विद्यालय-किवळे, राजे छत्रपती विद्यालय-चांदुस, श्री सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय-ठाकूर पिंपरी, श्री सुभाष माध्यमिक विद्यालय-बहुळ, श्रीमंत महाराज फत्तेसिंग गायकवाड माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालय-दावडी, हनुमान विद्यालय-चिंचोशी, श्री भानोबा विद्यालय-कोयाळी, श्री शरदचंद्र विद्यालय-वडगाव, नवीन माध्यमिक विद्यालय-मरकळ, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय-सोळू, कै.ज्ञानेश्वर गणपतराव टाकळकर विद्यालय- टाकळकरवाडी, रत्नाई महाविद्यालय-राजगुरुनगर, विधी महाविद्यालय- राजगुरुनगर, साने गुरुजी विद्यालय-खरपुडी, न्यू इंग्लिश स्कूल-निमगाव, नूतन विद्यालय-रेटवडी, ज्ञानदीप विद्यालय-शिवे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय-करांजविहरे, भामचंद्र माध्या व उच्च माध्या विद्यालय-भांबोली, श्री शिवाजी विद्यालय-चाकण, माध्यमिक विद्यालय-सायगाव, हुतात्मा राजगुरू विद्यालय-खेड, न्यू इंग्लिश स्कूल-काळूस, नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय-काळूस, कै. वसंतराव मांजरे विद्यालय-मांजरेवाडी, मॉडर्न हायस्कूल-भोसे, राष्ट्रीय विद्यालय-कुरकुंडी, श्री. शिवाजी विद्यालय-शेलपिंपळगाव या सर्व विद्यालयांमध्ये जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.