पुणे : न्यूझीलंडविरूध्द होणा-या आगामी कसोटी क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रोलीया संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही कसोटी मालिका १२ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रोलीयाने तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी संघात एक मोठा बदल केला आहे. पाकिस्तान विरूध्द नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत संघात समावेश असलेल्या कॅमरन बैनक्राफ्टला संघातून वगळण्यात आलं आहे.
ऑस्ट्रोलीया क्रिकेट मंडळाने जाहीर केलेल्या १३ जणांच्या संघाचे नेतृत्व टिम पेनकडं सोपविलं आहे. तसेच फक्त दोन एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या माइकल नेसरला बैनक्राॅफ्ट एेवजी संघात स्थान देण्यात आलं आहे. २९ वर्षीय माइकल नेसर अष्टपैलू खेळाडू असून त्याने शैफील्ड शील्ड आणि घरगुती टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
After a 2-0 series win against Pakistan, the National Selection Panel have announced a 13-player squad to take on New Zealand in the Domain three-Test series: Paine (c), Burns, Cummins (vc), Hazelwood, Head (vc), Labuschagne, Lyon, Neser, Pattinson, Smith, Starc, Wade, Warner. pic.twitter.com/4qN5wZRUzF
— Cricket Australia (@CricketAus) December 2, 2019
ऑस्ट्रोलीया क्रिकेट मंडळाच्या माहितीनुसार, कॅमरन बैनक्राफ्टला स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं आहे. जर मालिकेदरम्यान एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याच्याजागी बैनक्राफ्टला संघात संधी दिली जाईल.
ऑस्ट्रोलीया संघ : टिम पेन (कर्णधार ), जोए बर्न्स, डेविड वार्नर, पैट कमिंस (उपकर्णधार), ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशाने, मैथ्यू वेड, जोश हेजलवुड, माइकल नेसर, नाथन लयोन, जेम्स पैटिंसन और मिचेल स्टार्क।
कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
१) पहिली कसोटी : १२ ते १६ डिसेंबर: पर्थ
२) दुसरी कसोटी : २६ ते ३० डिसेंबर : मेलबर्न
३) तिसरी कसोटी : ३ ते ७ जानेवारी : सिडनी.