पुणे: हैद्राबाद मध्ये एका महिला पशुवैद्यकीवर बलात्कार करत तिची हत्या करून, नंतर तो मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी चार नराधमांना अटक केली आहे. या घटनेचा सर्स्थरांतू निषेध नोंदविण्यात येत असून, पुण्यातील विविध संघटनांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदविला आहे.
पुण्यातील गुडलक चौकात सायंकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांनी निदर्शने करत या अमानुष अत्याचार आणि हत्येचा निषेध नोंदविला आहे. यावेळी विद्यार्थी नेते कुलदीप आंबेकर, शर्मिला येवले, सचिन पांडुळे, सतीश गोरे, मोहिनी जाधव आदी तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हैद्राबाद या ठिकाणी युवतीवर झालेल्या बलात्काराची मानवतेला काळीमा फासणारी हि घटना अाहे.या कृतीचा निषेध व्यक्त करावा तेवढा कमीच.या घटनेतुन असे दिसते की, आपली वाटचाल कुठे चालली आहे? हा प्रकार म्हणजे वासनाधीनतेत असे लोक कीती टोकाचं पाउल उचलतात याचा नमुना असून, समाजाने गार्भीयांने विचार करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आंबेकर यांनी व्यक्त केले.