पोलिसांत चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
लोणी काळभोर – दोन आठवड्यांपुर्वी दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिसऱ्याचा काहीएक संबंध नसताना चौघांनी मिळून पीव्हीसी पाइपने पाय, हात व पाठीवर मारहाण करीत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना ऊरूळी कांचन येथे घडली आहे.
पोलीसांनी दिलेलली माहिती अशी की, याप्रकरणी अनुज नवनाथ आढाव (वय 18, रा.सोरतापवाडी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयुर काळे व त्याचा मित्र भुजबळ (पुर्ण नाव माहीत नाही. दोघे रा. उरूळी कांचन) व त्यांचे दोन साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुज आढाव व गणेश कुंजीर (रा. वळती, ता.हवेली) हे दोघे एकत्र शिक्षण घेत असल्याने चांगले मित्र आहेत. सुमारे दोन आठवड्यापूर्वी गणेश कुंजीर व ओम काळे यांच्यामध्ये शिंदवणे (ता. हवेली) येथे भांडणे झाली होती.
त्यावेळी गणेश याने फोन करून अनुज याला बोलावून घेतले. तो सदर ठिकाणी गेला होता. परंतु, त्यांच्या भांडणमध्ये पडला नाही. त्यांनतर तो घरी निघुन गेला होता. गुुरूवारी (दि.28) सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अनुज व त्याचा मित्र निखील आहीरे हे दोघे उरूळी काचंन मधील एका चहा सेंटर मधील ऋत्वीक कुंजीर याच्याकडे उसने दिलेले पैसे घेण्यासाठी गेले होते. ते पैसे घेवुन वडेवाल्याजवळ थांबले होते. त्यावेळी ओम काळे व त्याचा भाऊ मयुर काळे हे तेथे आले.
मयुर याने गैरसमज करून घेवुन अनुज याचा ओम व गणेश यांच्या भांडणामध्ये काहीएक संबंध नसताना मयुर व त्याचा मित्र भुजबळ व इतर दोन अनोळखी इसम यांनी पीव्हीसी पाइपने पाय, हात व पाठीवर बेदम मारहाण करून हात व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये अनुज जखमी झाला म्हणून त्यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे.