लखनौ : वेस्टइंडिज-अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या एकमेव कसोटीच्या दुस-या दिवसअखेर दुस-या डावात अफगाणिस्तानने ७ बाद १०९ धावसंख्येपर्यत मजल मारली असून वेस्टइंडिजवर १९ धावांची आघाडी घेतली आहे. आजच्या खेळावर पूर्णपणे वेस्टइंडिजचे वर्चस्व राहिले.
Stumps in Lucknow and what a day for West Indies 🙌
Afghanistan go from 53/0 to 109/7 and lead West Indies by just 19 runs with four wickets in hand.
Earlier in the day Shamarh Brooks hit his maiden Test century 👏 pic.twitter.com/RP9Dx68sGC
— ICC (@ICC) November 28, 2019
दुस-या डावात अफगाणिस्तानने सावध सुरूवात केली. इब्राहिम जदरान आणि जावेद अहमदीने पहिल्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. जदराला २३ धावांवर रहकेम काॅर्नवालने बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर जावेद अहमदी वगळता एकही फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. इहसानुल्लाह ०१, रहमत शाह ०, असगर अफगान ०, नासिर जमाल १५, आमिर हमजा १ धावांवर माघारी परतले. त्यानंतर जावेद अहमदी ६२ धावांवर बाद झाल्यावर दुस-या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला, तेव्हा अफसर जजई नाबाद २ धावांवर खेळत होता. वेस्टइंडिजकडून दुस-या डावात रहकेम काॅर्नवाल आणि राॅसटन चेजने प्रत्येकी ३ गडी बाद केले.
Make that 3-1-10-3 for Roston Chase, he dismisses Javed Ahmadi with the final ball of the day! https://t.co/OlRxI6xYoJ
— ICC (@ICC) November 28, 2019
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा पहिला डाव १८७ वर संपुष्टात आला होता. त्यानंतर दुस-या दिवशी वेस्ट इंडिजने शमर ब्रूक्सच्या दमदार शतकी (१११) आणि जाॅन कैंपबेलच्या अर्धशतकी (५५) खेळीच्या जोरावर पहिल्या डावात २७७ धावा करत महत्वपूर्ण अशी ९० धावांची आघाडी घेतली होती.