मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
-
- शरद पवार शिवतीर्थावर पोहचले
- अजित पवार, सुप्रिया सुळे सोबत शपथविधीला हजार
- राज्यभरातून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शपथविधीला हजर
- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिपथविधी सोहळ्याला राज ठाकरे शिवतीर्थावर दाखल
- उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला मातोश्री वरून रवाना
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व शिवसेनेचे सर्व नेते शितीर्थावर दाखल
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, द्रमुक नेते स्टालिन, टी. आर. बालू, काँग्रेस नेते अहमद पटेल व्यासपीठावर उपस्थित
- काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल शिवतीर्थावर दाखल
- राज ठाकरे कुटुंबियांसह उपस्थित, आई कुंदा, मुलगा अमित, बहीण जयजयवंती आणि मेहुणे अभय देशपांडे उपस्थित
- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि राज ठाकरे यांच्यात व्यासपीठावर गप्पा
- राज्यपाल भगतसिंह कौश्यारी शिवतीर्थावर दाखल
- उद्धव ठाकरे मंचावर दाखल
- उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
- शिवसेना नेते एकनाथ शिंदेनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील शिवतीर्थावर उपस्थित
- मुकेश अंबानी, नीता अंबानी कुटुंबीयांसह शिवतीर्थावर हजर
- राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
- काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ