शहाजहानपुर : भाजपचे माजी केंदीय मंत्री स्वामी चिन्मनयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या एलएलएमच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थीनीला या परिक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे.
कॉलेजात पुरेशी हजेरी नसल्याचे कारण सांगून तिला या सेमस्टिरची परिक्षा देण्यास मनाई करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या 23 वर्षीय विद्यार्थिनीने पोलिस बंदोबस्तात सोमवारी आपला पहिल्या सेमिस्टरचा राहिलेला पेपर दिला. पण तिला तिसऱ्या सेमिस्टरची परिक्षा देण्यास मनाई करण्यात आली.
त्यासाठी तिने कॉलेजातील 75 टक्के उपस्थितीची अट पुर्ण केली नाही असे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या बलात्कार पीडित विद्यार्थिनीवर स्वामी चिन्मयानंद यांच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप करीत तिलाही तिच्या तीन मित्रांसह या प्रकरणात अटक केली आहे. सध्या ती उत्तरप्रदेशातील शहाजहानपुर कारागृहात आहे. तिला पोलिस बंदोबस्तात मंगळवारी तिच्या कॉलेजात परिक्षेसाठी नेण्यात आले होते.