“दिशा’ विधेयक मंजूर

बलात्काऱ्यांना 21 दिवसांत फाशीची तरतूद

हैदराबाद :  आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्काऱ्यांना 21 दिवसांत फाशीची तरतूद असणारे “दिशा विधेयक 2019′ मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकात बलात्कार तसेच सामूहिक बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असून 21 दिवसांत खटला पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आले आहे. याआधी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी दोन विधेयक मंजूर केली आहेत.

दिशा विधेयकाला आंध्र प्रदेश क्रिमिनल लॉ (सुधरणा) कायदा 2019 म्हटले आहे. या विधेयकांतर्गत बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या अपराधची सुनावणी जलद करत, 21 दिवसांच्या आत निकाल लावण्याची आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने दिशा विधेयक मंजूर केले होते. सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकरणांची सुनावणी चार महिने चालते.

दरम्यान, हैदराबाद शहराबाहेर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या भीषण घटनेनंतर आंध्र प्रदेश सरकारने हे विधेयक विधानसेभेत पटलावर मांडले. त्यानंतर हे विधेयक बहुमताने मंजूर झाले. राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी महिलेंच्या सुरक्षिततेकरीता या कायद्याला मंजूरी दिली. तर हैदराबाद घटनेतील पीडिताच्या नावावर आधारित या कायद्याला, आंध्र प्रदेश दिशा कायदा, असे नाव ठेवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.