ग्रामस्थांनी दिला शिक्षकाला चोप
जामखेड: तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी येथील मुख्याध्यापक संभाजी कोंडीबा सरोदे, रा जामखेड याने त्यांच्याच शाळेतील एका नऊ वर्षांच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शिक्षकाकडून अशा प्रकारची कृत्ये घडत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर आमची मुलींना शिक्षकांपासूनच धोका असेल तर आम्ही त्यांना शाळेतच पाठवायचं नाही का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जामखेड शहरात एकाच खळबळ उडाली असून, सर्व स्थरातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलिसांनी विनभंगाचा गुन्हा दाखल करुन त्या शिक्षकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत.