नगर – देशातील पोस्ट सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. नागरिकांच्या मनामध्ये पोस्ट सेवेबद्दल एकवेगळ्याप्रकारचे स्थान निर्माण केले आहे. मात्र पत्रव्यवहारांमध्ये अथवा संभाषणामध्ये आही प्रसंग असे निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारींचा योग्यप्रकारे निपटारा व्हावा यासाठी पोस्ट विभागाने डाक अदालत घेण्याचे नियोजन केले आहे.
पोस्टाच्या कामकाल्जा बद्दलच्या ज्या तक्रारींचा निपटारा सहा आठवड्यात झाले नसेल अशा तक्रारींचे निवारण या डाक अदालतीत केले जाणार आहे. या डाक अदालतीचे दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात आयोजन करण्यात आले असून पुणे कार्यालयाची ही 54वी डाक अदालत आहे. अशाच डाक अदालतीचे आयोजन मुंबईतूनही करण्यात आले असून ती 16 डिसेंबर रोजी होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या डाक अदालतीत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांशी संबंधित तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. मुंबईतील ही 111 वी डाक अदालत असून या दोन्ही डाक अदालतीत यापूर्वी केलेल्या तक्रारींचा तपशीलासह ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्याचे नाव आणि हुद्द्यासह तक्रार दोन प्रतीत 30 नोव्हेंबर पुर्वी पोहोचतील अशा रीतीने पाठवाव्यात.