चऱ्होली खुर्द येथील प्रकार : 12 जणांवर गुन्हा
आळंदी- बनावट कागदपत्रे सादर करून जमीन नावावर केल्याप्रकरणी 12 जणांवर आळंदी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 17) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 जानेवारी 2013 ते 26 डिसेंबर 2018 या कालावधीत चऱ्होली खुर्द (ता. खेड येथे घडली.
सचिन प्रकाश माळी (वय 35, रा. वाडारोड, ता. खेड), विलास शंकर भोसले (वय 56), छबूबाई भोसले (वय 67), जाईबाई महादू रोकडे (वय 60), इंदुबाई सदाशिव कांबळे (वय 60), शशिकांत शंकर भोसले (वय 48) आणि अन्य सहाजण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विलास तुकाराम भोसले (वय 57, रा. लोहगाव, पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चऱ्होली खुर्द येथे विलास यांची 43 आर जमीन आहे. आरोपींनी या जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करून विलास यांची जमीन सचिन यांच्या नावावर करून दिली. त्यानंतर आरोपींनी विलास आणि त्यांच्या कुटुंबीयांना दमदाटी केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.