सहकार महर्षी कारखाना कर्जातून मुक्त

अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील; गळीत हंगामाचा शुभारंभ

अकलूज- सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता मोठी आहे. उसास जादा दर देता यावा यासाठी डिस्टिलरी सिटिक सिड सहवीज निर्मिती प्रकल्प उभे केले आहेत. या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पासाठी घेतलेल्या कोट्यवधी कर्जातून कारखाना आता मुक्त झाला आहे, असे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 58वा गळीत हंगाम शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, किशोरसिंह माने पाटील कारखान्याचे संचालक, सुरेश पाटील, विजय माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, बाबूराव पताळे, नितीनराजे निंबाळकर, मारुती घोडके, अमरसिंह माने-देशमुख, कारखान्याचे सभासद, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

मोहिते पाटील म्हणाले की, जास्त ऊस गाळपास आला तर उत्पादन खर्च कमी होतो व जादा दर देता येतो याकरीता गाळपास जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे. कारखान्याने ऊसविकास विभाग सूरू करून शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढावे, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी सुक्ष्म सिंचन व शेततळी योग्यजातीचे बेणे आदि केलेल्या प्रयत्नास यश मिळाले आहे.
कारखान्याने या गळीत हंगामात सात लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ठ ठेवले असून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उपलब्ध करणेत आलेली असून प्रति दिवशी 8 हजार मे.टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वीत केली असल्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चोगुले यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)