बॉलिवुडमधील किंग खान अर्थात शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना ही बी-टाउनमधील चर्चित स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहानाने अजुन बॉलिवुडमध्ये डेब्यू केलेले नाही, पण सोशल मीडियावर तिचे फॉलोइंग जबरदस्त आहेत. तसे पाहात सुहाना खानचे अकाउंट प्रायव्हेट आहे, परंतु तिच्या नावाचे अनेक अकाउंट्स आहेत. त्यावर पुन्हा एकदा सुहानाच्या कॉलेज डेजमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोत 19 वर्षीय सुहाना तिच्य सहका-यांसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसते. यात तिने व्हाईट गंजी टॉप, ब्लॅक पॅट्ससोबत ब्लूक टोपीही घातलेली आहे. यात तिचे केस मोकळे असून तिने मेकअप केलेला दिसत नाही. या फोटोत सुहाना खूपच सुंदर अशी दिसत आहे. या फोटोवर अनेक कॉमेंटस् येत असून लाखोंच्या संख्येने लाईकस् मिळत आहे.
दरम्यान, सुहानाने लंडन येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही महिन्यांपूर्वी शाहरुख आणि गौरी आपल्या मुलीच्या पदवी समारंभासाठी लंडनला गेले आहे. तसेच सध्या सुहाना न्यूयॉर्क विद्यापिठात अभिनयाचे धडे गिरवित आहे. याचे अनेक फोटो सुहाना कायम सोशल मीडियावर शेअर करत असते.