श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नरवणे – माण तालुक्यातील दिडवाघवाडी येथील श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त सोमवार दि. 11 ते 14 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच मंगळवारी भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार आहे, अशी माहिती दिडवाघवाडीचे सरपंच व माण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी दिली आहे. सोमवार, दि.11 रोजी सकाळी 9 वा. “श्रीं’ चे पुजन करण्यात आले असून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
मंगळवार, दि.12 रोजी दुपारी 2 वा. भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. भारत मदने व पै. पै.अतुल पाटील यांची एक लाख रुपये इनामाची कुस्ती होणार आहे. ही कुस्ती पीएसआय भारत ढेंबरे, पै. सत्यवान दिडवाघ, कै. पांडुरंग गोरड यांच्या स्मरणार्थ मोहन गोरड यांच्यातर्फे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. तानाजी विरकर व पै.नामदेव कचरे यांची 75 हजार रुपये इनामाची ही कुस्ती शुभश्री ट्रॅव्हल्स बबनराव पडळकर यांच्यातर्फे, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. जयदीप गायकवाड व पै.संदीप काशिद यांची 75 हजार रुपये इनामाची ही कुस्ती यात्रा कमिटी यांच्यातर्फे, चौथ्या क्रमांकांची कुस्ती स्थानिक पै. भावेश सावंत व पै. धनाजी भोसले यांची 50 हजार रुपये इनामाची यात्रा कमिटीच्या वतीने, पाचव्या क्रमांकांची कुस्ती स्थानिक पै.गोविंद दिडवाघ व पै. अक्षय ठोंबरे यांची 50 हजार रुपये इनामाची सदाशिव गोरड यांच्यातर्फे लावण्यात आल्या आहे. यावेळी इतर अनेक चटकदार कुस्त्या होणार आहेत.
100 रूपये ते 5000 रुपयांपर्यतच्या कुस्त्या त्याचदिवशी मैदानात जोडल्या जाणार आहेत. सायंकाळी 9 वाजता वैभव आर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी दि.14 रोजी यायंकाळी श्रींची मिरवणूक (छबिना) काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बाळासाहेब काळे यांनी केले आहे.