ईशान देगमवार, अलिना शेख विजेते

पुणे: आदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी (एपीएमटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या ईशान देगमवार, अलिना शेख या खेळाडूंनी विजेतेपद मिळविले.

डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत ईशान देगमवार याने आर्यन सुतारचा 3-6, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 2 तास 15 मिनिटे चालला. ईशान हा व्हीकटोरीयस किड्‌स एज्युकेअरमध्ये नववी इयत्तेत शिकत असून इंटेसिटी टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक अतुल देवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुलींच्या गटात अंतिम फेरीत अलिना शेख हिने प्रिशा जुनेजाचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. अलिना ही आठवी इयत्तेत उंड्री येथील बिशप्स शाळेत शिकत असून मॅसट्रो टेनिस अकादमीत प्रशिक्षक प्रणव वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी फेड कप टेनिसपटू राधिका तुळपुळे-कानिटकर आणि सध्याची अव्वल भारतीय महिला टेनिसपटू प्रांजला येडलापल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एपीएमटीएचे आदित्य मडकेकर, एआयटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आणि अजय कामत आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.