खंडोबा मित्र मंडळ खैरे आळी (रायगड) व तांबे आळी समाधान रासकर ग्रुप (जंजिरा) प्रथम
नारायणगाव – आमदार अतुल बेनके युवा मंच व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत खंडोबा मित्र मंडळ खैरे आळी (रायगड) व तांबे आळी समाधान रासकर ग्रुप (जंजिरा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेतील सहभागी 250 स्पर्धकांना लक्ष्मी सिनेप्लेक्स येथे हिरकणी मराठी चित्रपट दाखविण्यात आला. अशी माहिती आयोजक सूरज वाजगे यांनी दिली.
या स्पर्धेत 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातून क्रमांक व विजेते ठरवण्यासाठी विभागून क्रमांक देण्यात आले. प्रथम क्रमांक- खंडोबा मित्र मंडळ खैरे आळी(रायगड)/तांबे आळी समाधान रासकर ग्रुप (जंजिरा). द्वितीय क्रमांक- विक्रांत बाल क्रीडा मंडळ(विजयदुर्ग)/कुलस्वामिनी मित्र मंडळ पेठ आळी (रायगड). तृतीय क्रमांक- भागेश्वर मित्र मंडळ वारुळवाडी(राजगड)/आनंद सोसायटी(रामशेज). चतुर्थ क्रमांक- सानिका कोल्हे व ग्रुप (सिंधुदुर्ग)/सोमनाथ मित्र मंडळ बुरुंज (कोरलायी गड). उत्तेजनार्थ- वेदांत कोल्हे व ग्रुप/नवशक्ती मित्र मंडळ वारूळवाडी. स्पर्धेला पारदर्शकपणा आणण्यासाठी प्रोजेक्टर स्क्रीन वर स्पर्धकांचे किल्ले दाखवून क्रमांक ठरवण्यात आले.
बक्षीस वितरण आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते हस्ते करण्यात आले. यावेळी राजश्री बोरकर, अंजली खैरे, गणेश वाजगे, रोहीदास केदारी, रामदास अभंग, पुष्पा जाधव, कुंदा इचके, वर्षा तांबे, मुकेश वाजगे, हर्षल वाजगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
हिरकणी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेते अमित खेडकर यांनी उपस्थित राहून सर्व बालशिवभक्तांना प्रोत्साहित केले. किल्ले स्पर्धा राबवून घरोघरी-चौका चौकात किल्ले बनवून जो इतिहास सादर केला हा मूळ उद्देश या स्पर्धेमागे होता.