बॉलीवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अमिताभ बच्चन आपल्या ट्विटर अकाउंटवर ‘फोटोज’ आणि ‘व्हिडीओ’ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करतात. आणखी एक व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
This Is How Legends Play Diwali ??? pic.twitter.com/6qbX7A8fkW
— स्वर्ण सौरभ (@srrespects) October 25, 2019
या व्हिडीओमध्ये एक माणूस दिवाळीच्या काळात आपल्या सिगारेटने रॉकेट लावताना दिसत आहे. व्हिडीओमधील हा माणूस न घाबरता एका मागोमाग एक सिगारेटने रॉकेट लावताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘असे करू नये’ अशी विनंती बिग बींनी केली आहे.
हे भगवान । न करो एसे भैया । https://t.co/yF0q5Kw2mv
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 27, 2019
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुटीन चेकअपनंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. अमिताभ यांना यकृताची समस्या असल्यामुळे त्यांना वेळोवळी तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागते.