पिंपरी – सोशल मीडियावर चॅटिंग करण्यास पतीने विरोध केल्याने विवाहितेने दोन लहान मुलांसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगवी येथे शनिवारी (दि. 26) सायंकाळी ही घटना घडली.
रश्मीता राजेंद्र दास (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मृत महिलेचा भाऊ राजेश कुमार दास यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती राजेंद्र चंद्रमनी दास (वय 37) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मिता ही आपल्या नातेवाईकांशी सोशल मीडियावर “चॅट’ करत होत्या. या कारणावरून रश्मिता आणि तिचे पती यांच्यात जोरदार भांडण झाले. रागात पतीने पत्नीला मारहाणही केली. पती कामावर गेल्यानंतर रागात रश्मिता यांनी दोन लहान मुलांसमोरच गळफास घेत आत्महत्या केली.
ऐन दिवाळीत पतीच्या जाचाला कंटाळून रश्मीता यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याने घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.