बॉलिवूडमधील कलाकारांसाठी वर्कआउट हे त्यांच्या जीवनातील एक दैनंदिनीचा भाग आहे. याबाबत आलिया भट्टचे सांगायचे झाल्यास हेल्दी लाइफस्टाइलसाठी ती खूपच मेहनत घेत असते. ती आपले वर्कआउट पोस्टस् सतत इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ज्यामुळे तिला जिम जाण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळते.
सोशल मीडियावर आलियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती आपली जीवलग मैत्रीण आकांक्षा राजनसोबत वर्कआउटनंतर मस्तीच्या मूडमध्यी असल्याचे दिसते. यात वर्कआउट करून आलिया खूपच दमलेली दिसते. या व्हिडिओला आलियाच्या चाहत्यांनी लाखो लाईकस् देत तिच्या वर्कआउटवर कॉमेंटस् दिल्या आहेत.
दरम्यान, वर्क फ्रंटबाबत बोलायाचे झाल्यास आलिया सध्या अयान मुखर्जी यांच्या आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चनही मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय एसएस राजामौली यांच्या “आरआरआर’ आणि महेश भट्ट यांच्या “सडक-2’मध्येही ती काम करत आहे. यात संजय दत्त, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूरही झळकणार आहेत.