पुणे – जिल्हा प्रशासनाने नव्याने मतदार यादीमध्ये 42 हजार 581 मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 77 लाख 29 हजार 217 इतकी झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी दि. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी केंद्रनिहाय मतदार यादी तयार झाली असून अंतिम यादी दि.31 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यात एकूण 76 लाख 86 हजार 636 मतदार होते.
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दि. 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. यामध्ये आलेले अर्ज मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. ही नावे पुरवणी मतदारयादीत समाविष्ट केले आहे.
दरम्यान, यामध्ये पुरुष मतदार 40 लाख 42 हजार 89, तर महिला मतदारांची संख्या 36 लाख 86 हजार 885 इतकी आहे.