शिवप्रकाश यांचे आवाहन : बारामतीत भाजपाची बैठक
बारामती – बारामती लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी भाजपा पदाधिकारी यांची तातडीची बैठक आयोजित केली. बैठकीमध्ये बूथ आढावा, बूथ समिती कार्यान्वित करून फक्त बुथच नाही तर बुथमधील लाभार्थी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना केले.
भारतामधील लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारासाठी काम करण्याकरिता कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या.
भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा मुख्यालय प्रभारी रवी आनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पुणे जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल,
भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, योगेश बाचल, नवनाथ पडळकर, अशोक टेकवडे, कांचन कुल, शरद ढमाले, जालिंदर कामठे, शेखर वडणे, आकाश कांबळे, अभिजीत देवकाते, बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.