एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध
पुणे – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. आता मतदारसंघात एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत.
एकूण 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अपक्ष अर्ज दाखल केलेले नरेंद्र पावटेकर यांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्याने अर्ज बाद करण्यात आला.
तसेच, बहुजन समाज पक्षाचे फैय्याज मुश्ताक सय्यद राज यांच्या ए.बी. फॉर्मवर खाडाखोड केल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे, उमेदवारी अर्जाच्या छाननीत एकूण 15 उमेदवारांपैकी दोन अर्ज बाद करण्यात आल्याने 13 अर्ज वैध ठरलेले आहेत.